सन्मती बाल निकेतन आश्रम भेट व
चर्चासत्र २०१९

विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमासाठी पुण्यामध्ये ओळखला जातो. 🙌🏻प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांना सामाजिक भान कळावे ह्या हेतूने क्लासतर्फे दिवाळीमध्ये अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमाला भेट दिली जाते तसेच त्याठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत फराळ वाटप व इतर उपक्रम घेतले जातात. शैक्षणिक वर्ष २०१९ च्या नियोजनानुसार आम्ही ह्या वर्षी ‘डॉ.सिंधुताई सपकाळ’ ह्यांच्या ‘सन्मती बालनिकेतन आश्रम’ ला दिनांक २४ ऑक्टोबर २०१९ रोजी निवडक ६५विद्यार्थी व १०शिक्षक घेऊन भेट दिली. आश्रमात गेल्यावर आश्रम प्रमुख विद्याताईंनी सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण आश्रमाची सविस्तर माहिती सांगितली. विद्या ताई त्याठिकाणी मुलांची अभ्यासाची तसेच इतर गोष्टींची काळजी घेतात व संपूर्ण आश्रम सांभाळतात.(विद्या ताई स्वतः अनाथ आहेत व गेल्या 20 वर्षांपासून माई सोबत आहेत.) आश्रमाची माहिती घेतल्यानंतर स्वतः माईंनी (डॉ.सिंधुताई सपकाळ) मुलांशी संवाद साधला. त्यांचे आयुष्यातील कठीण व खडतर अनुभव मुलांना सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुम्ही सुद्धा भविष्यात कमावते झाल्यावर निदान एक विदयार्थ्याची शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घ्यावी असे आव्हान केले. मुलांनी माईंना विविध प्रश्न विचारून त्याची उत्तरे जाणून घेतली. माईंना त्यांच्या आयुष्यात आलेले चांगले , वाईट अनुभव मुलांनी ऐकले आणि भविष्यात असेच चांगले काम करू असे आश्वासन त्यांना दिले. विद्यार्थ्यांनी आश्रमाला दिवाळी फराळ , आश्रमासाठी तयार केलेले खास आकाश कंदील व क्लासतर्फे तसेच पालकांतर्फे एकूण १५,००० रुपयांची आर्थिक मदत माईकडे सुपूर्द केली.

माईंचे बरेच अनुभव ऐकताना अनेक विद्यार्थी भावुक झाले होते, तसेच तेथे गेल्यावर त्यांना आपल्याला आई वडील का महत्वाचे आहेत ह्याची नक्कीच जाणीव झाली.

कदाचित इथून पुढे हे विद्यार्थी आपल्या पालकांसमोर कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट धरून बसणार नाहीत एवढ तर नक्कीच.

विद्या एज्युकेशन क्लासेस च्या मार्फत आम्ही सर्व नागरिकांना सन्मती बाल निकेतन आश्रम ला भेट देण्याचे तसेच आर्थिक किंवा वस्तू स्वरूपी मदत करण्याचे आव्हान करीत आहोत. माईंनी समाजामध्ये उभ्या केलेल्या कामाला तसेच त्याच्या खडतर प्रवासाला विद्या एज्युकेशन क्लासेस तर्फे मनापासून सलाम ..!!!!

आश्रम भेट व चर्चासत्र साठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे व विदर्थ्यांचे विशेष आभार.