शैक्षणिक सहल २०१९

नाविन्यपूर्ण व विशेष उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्या एज्युकेशन क्लासेसने गतवर्षीप्रमाणे या वर्षी देखील १०० विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित केली होती. रोजच्या दैनंदिन अभ्यासात तसेच विविध विचारांत गुंग असलेल्या मुलांना निसर्गाचा एक वेगळा अनुभव देण्याकरता क्लासतर्फे या वर्षी Adventure Plus Resort या ठिकाणी सहल आयोजित केली होती. सदर शैक्षणिक सहली अंतर्गत 'प्रति बालाजी मंदिर आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं 'Adventure Plus Park' ह्या ठिकाणी भेट देण्यात आली. बऱ्याचदा क्लासला वेळेत न येणारे विद्यार्थी सहलीच्या दिवशी मात्र सकाळी ५.३० वाजता क्लासमध्ये जमले होते. विद्यार्थ्यांना सर्वात आधी केतकावळे येथील बालाजी मंदिरात घेऊन जाण्यात आले,त्याठिकाणी काही LeadershipDevlopement शी निगडित activity घेण्यात आल्या व सकाळी 10 च्या सुमारास सर्व जण 'AdventurePlusPark' येथे पोहचले. मुलांनी नाश्ता केल्यानंतर १०.३० ते १२.३० मध्ये आयुष्याची दिशा ठरवणारे तसेच आयुष्याला कलाटणी देणारे आर्टऑफलिव्हिंग चे एक संपूर्ण सत्र आंतराष्ट्रीय दर्जाच्या प्रा.चापते सर ह्यांच्या मार्फत घेण्यात आले. या सत्रामध्ये मुलांना सरांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना आयुष्य कसे जगावे व आयुष्यामध्ये आपल्या पालकांचे का महत्त्व आहे ह्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना भावनिक पद्धतीने विविध पैलू समजावून सांगण्यात आले. त्यादिवशी मुलांना आयुष्यातील एक वेगळा अनुभव मिळाला आणि आपल्यासाठी आपले आई-वडील किती महत्वाचे आहेत याची जाणीव झाली. शेवटी शेवटी जवळपास सर्वच विद्यार्थी अक्षरशः रडले. भविष्यात आईवडिलांचे सर्व ऐकू व त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करू असं आश्वासन सर्वानी चापते सरांना दिले.

सत्र संपल्यावर त्याठिकाणी विद्यार्थ्यांचे विविध गट करून 'Adventourous Activity' घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आवडीनुसार सर्व ऍक्टिव्हिटीज केल्या. झिप लाईन, बर्मा ब्रिज, रायफल शूटिंग , रोप क्लाइंबिंग अशा वेगवेगळ्या अॅडव्हेंचरअॅक्टिव्हिटीज़ घेण्यात आल्या. अश्या ऍक्टिव्हिटी केल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढलेला दिसला. दुपारी २.०० वाजता सर्व मुलांनी जेवणा मध्ये पंच-पक्वानांचा आस्वाद घेतला. त्यानंतर सर्व मुले रेन डान्स , स्वीमिंग आणि बोटिंगसाठी रवाना झाली, त्यामध्ये मुलांनी मनसोक्त स्विमिंग केली तसेच रेन डान्स सुद्धा केला. त्यानंतर सर्व मुलांसाठी हाय टी ची व्यवस्था करण्यात आली होती. नंतर विद्यार्थ्यांचे प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांचे 10 गट तयार करून त्यांची MadAdd नावाची ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांनी वेळवेगळ्या कल्पना वापरून उत्तमप्रकारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांचे विविध सुप्त गुण पाहायला मिळाले. त्यानंतर शेकोटी , रस्सी खेच , डी.जे व विविध गाण्यांवर डान्स करून रात्री ९.३० वाजता जेवण आटोपून सर्व जण पुन्हा पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाले. या सहलीचा उद्देश केवळ फिरणे नव्हता तर विद्यार्थ्यांमध्ये चांगले बदल घडवणे, त्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा मिळवून देणे, व्यक्तिमत्व विकसित करणे हा होता. विद्यार्थ्यांना यामध्ये अनेक नाविण्यापूर्ण गोष्टी शिकायला मिळाल्या. व्यवस्थापन कौशल्य आत्मसात करणारे खेळ घेऊन विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्याचा विकास करण्यावर भर दिला गेला. करिअरविषयी त्यांना मार्गदर्शन केले गेले. मुळात संपूर्ण सहल आनंदात व उत्साहात पार पडली. आमच्यावर विश्वास ठेऊन आपल्या पाल्यास सहलीला पाठवल्याबद्दल सर्व पालकांचे विद्या एज्युकेशन क्लासेसतर्फे मन:पूर्वक आभार ..!

उद्याच्या भारताचे सुजाण, सुशिक्षित, सुसंस्कृत व राष्ट्रप्रेमी युवा पिढी घडवण्याच्या, विद्या एज्युकेशन क्लासेसच्या कार्यात आजच सहभागी व्हा. आजच आपला प्रवेश निश्चित करा कारण आम्ही फक्त शिकवतच नाही तर उच्च संस्कार असलेली एक आदर्शपुढी घडवत आहोत...!