विद्या एज्युकेशन क्लासेस चे वार्षिक स्नेहसंमेलन व
बक्षीस वितरण समारंभ २०१९-२०

रविवार, दिनांक ५ जानेवारी २०२० रोजी सुहासिनी कार्यालय येथे पुण्यातील धायरी येथील नामांकित विद्या एज्युकेशन क्लासेस चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडले. कार्यक्रमा साठी अध्यक्ष व प्रमुख वक्ते म्हणून कर्तव्यदक्ष अधिकारी 'श्री.भानुप्रतापबर्गे' (Rtd. ACP) , इतिहास अभ्यासक श्री.निलेशभिसे व खडकवासल्याचे आमदार श्री.भीमरावतापकीर उपस्थित होते. क्लासतर्फे सर्व शिक्षक , विद्यार्थी व पालक मिळून ७०० हुन अधिकजण आवर्जून उपस्थित होती.

मोठ्या उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमात श्री.भानुप्रताप बर्गे सरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना देश विकसित करण्याकरिता आजच्या युवा पिढी ने कसे वर्तन केले पाहिजे तसेच महिला सबलीकरण ह्या विषयावर भाष्य केले. देशाच्या सीमेवर कर्तव्य बाजवणाऱ्या जवानांची व शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याची जाणीव ठेवून रोजचं आयुष्य जगा असं मत आवर्जून सरांनी नमूद केले तसेच आदर्श जीवनपद्धती कशी असावी ह्यावर त्यांचे मत मांडले. देशप्रेम व राष्ट्राभिमान जागृत ठेवणे का गरजेचं आहे याबद्दल सरांनी अनोख्या शैलीत कविता सुद्धा सादर केली. श्री.निलेश भिसे यानी आपले मत मांडताना आजच्या युवा पिढीची नैतिक कर्तव्य समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर आमदार श्री.भीमराव तापकीर यांनी क्लासच्या शिस्तीचे व निकालाचे कौतुक केले. भानुप्रताप बर्गे सरांकडून क्लासच्या विशेष कामगिरी करणाऱ्या १० विद्यार्थ्यांना सुद्धा गौरवण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभास शिवसेनेचे विभाग प्रमुख व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश गिरमे व श्री.समीर बदडे ह्यांनी सुद्धा विशेष उपस्थिती लावली. नृत्य, संगीत, गायन, नाटक असे नानाविविध प्रकारचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी यावेळेस सर्वांसमोर केले. मागील वर्षी इयत्ता १० वी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सर्व उपस्थित मान्यवरांचे सत्कार ब्रम्हाउद्योग समूहाकडून विशेष भेट देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चिन्मयपुजारी व नेहा मोकाशी मॅडम ह्यांनी केलं.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्या एज्युकेशन क्लासेस च्या नवीन दोन आनंदनगर व कर्वेनगर या शाखा १ मार्च २०२० पासून सुरू होतील अशी घोषणा देखील करण्यात आली.

गेल्या दशक भर विद्यार्थ्यां साठी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या संस्थेत आपल्या पाल्याचा प्रवेश नक्की निश्चित करा कारण आम्ही घडवत आहोत सुशिक्षित, सुसंस्कृत व राष्ट्रप्रेमी युवा पिढी...!!!